आता मोरोक्कोतही आधार कार्ड योजना होणार सुरु | AADHAAR Latest Update

2021-09-13 0

भारतात आधार कार्ड जोजना सुरु होवून अनेक वर्ष लोटली हळूहळू त्याचे फायदे लोकांना कळू लागले आहेत. पूर्वी अनेक कागदपत्रे ओळख म्हणून दाखवावी लागायची आता फक्त आधार कार्ड दाखविणे पुरेसे ठरते. आफ्रिकेतील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि उत्तर आफ्रिकेतील भारताचा महत्वाचा सहकारी देश असलेल्या मोराक्कोलाही त्यांच्या देशात आधार कार्ड सारखा कार्यक्रम सुरु करायचा आहे. भारतात ज्या पद्धतीने आधार क्रमांक विविध योजनांशी लिंक करण्यात आले आहे. त्याचपद्धतीने त्यांच्या देशातही जी योजना राबवायची आहे. मोरक्कोने हि प्रक्रिया जाणून घेण्यासाठी नुक्तेक गृहमंत्री नुरुद्दीन बोतायाब यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ भारतात पाठवले होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नुरुद्दीन ह्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रीजीजू आणि इतर अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires